आणखीन एक बँक घोटाळा

Foto
आईस्क्रीम बनवणार्‍या कंपनीने घातला 1400 कोटींचा गंडा
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआयने) दिल्लीतील क्वालिटी लिमिडेट या दुग्धव्यवसायाशी संबंधित कंपनीच्या आठ ठिकाण्यांवर छापे मारले. क्वालिटी वॉल्स आईस्क्रीम्ससाठी ओळखल्या जाणार्‍या या कंपनीतील दिल्लीच्या मुख्य कार्यालयाबरोबरच एकूण आठ ठिकाणी छापे मारण्यात आले. या कंपनीने नऊ बँकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप केला जात आहे. या बँकांची कंपनीने 1400 कोटींची फसवणूक करुन आर्थिक घोटाळा केल्याच्या संक्षयावरुन हे छापे टाकण्यात आल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले आहे.
या प्रकरणामध्ये सीबीआयने क्वालिटी लिमिटेड कंपनी आणि कंपनीचे संचालक संजय डिंग्रा, सिद्धार्थ गुप्ता, अरुण श्रीवास्तव यांच्याबरोबर अन्य काही व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आमच्याकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये बँक ऑफ इंडियाबरोबरच या कंपनीने कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदरा, आंध्रा बँक, कॉर्परेशन बँक, आयडीबीआय बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, धनलक्षमी बँक आणि सिंडिकेट बँकेला एकत्रितपणे एक हजार 400 कोटी 62 लाखांचा (अंदाजे) गंडा घातला आहे, असं सीबीआयचे प्रवक्‍त आर. के. गौर यांनी सांगितले.
बँक फंडांसंदर्भातील व्यवहार, संबंधित पक्षांशी निगडीत फसवणुकीचे व्यवहार, बनावट कागदपत्रे/पावत्या, खात्यांची खोटी माहिती, कंपनीच्या नावाने संपत्ती दाखवणे अशा वेगवेगळ्या मार्गाने कंपनीने ही फसवणूक केल्याचे गौर यांनी म्हटले आहे. सोमवारी आठ ठिकाणी छापे टाकून सीबीआयने कागदपत्रे जप्त केली आहेत. छापे टाकण्यात आलेल्या ठिकाणांमध्ये दिल्ली, सहारणपूर, बुंदेशहर (उत्तर प्रदेश), अजमेर (राजस्थान,) पवाल (हरयाणा) या ठिकाणांचा समावेश आहे. या ठिकाणी असणारी कंपनीची कार्यालये आणि इतर ठिकाणांवर सीबीआयच्या अधिकार्‍यांनी छापे टाकले. यावेळी महत्वाची कागदपत्रे आणि इतर दस्तावेज अधिकार्‍यांनी ताब्यात घेतला असून संचालकांबरोबरच कंपनीशी संबंधित इतर अन्य व्यक्‍तिंविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker